‘दिलखुलास’ कार्यक्रमात विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव.
मुंबई : - दि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात सायबर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव यांची ‘सायबर सुरक्षा जबाबदारी सर्वांची’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार दि.15, बुधवार दि. 16 आणि गुरुवार दि.17 डिसेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.
कोरोना काळात वाढलेले सायबर गुन्हे, सोशल मीडियावर टाकल्या जाणा-या चुकीच्या पोस्ट, ऑनलाईन खरेदी करताना होणारी फसवणूक, ऑनलाईन पेमेंट ॲप व त्यासंदर्भात घ्यावयाची काळजी, फेसबुकवर येणा-या चुकीच्या पोस्ट, ऑनलाईन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी आदी विषयांची माहिती श्री. यादव यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा