पंचायत समिती गडचिरोली यांचे जनतेला सूचना.
गडचिरोली : - दि.28: गडचिरोली जिल्हयातील सर्व जनतेला याद्वारे सुचित करण्यात येते की, पंचायत समिती, गडचिरोली अंतर्गत एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प गडचिरोली, जिल्हा परिषद (बांधकाम/सिंचाई/ग्रामिण पाणी पुरवठा) उपविभाग गडचिरोली, तालुका आरोग्य अधिकारी गडचिरोली, प्राथमिक आरोग्य केंद्र/पथक/उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने व 51 ग्रामपंचायत कार्यालयांचा समावेश आहे. शासन निर्देशानुसार सोमवार ते शुक्रवारपर्यंत वर्ग-3 चे कर्मचाऱ्यांकरीता कार्यालयीन वेळ सकाळी 09.45 ते 06.15 आणि वर्ग-4 चे कर्मचाऱ्यांकरीता सकाळी 9.30 ते सांयकाळी 6.30 पर्यंत निश्चित केली आहे. या संदर्भात सर्व कार्यालयांना सूचना देण्यात आलेली आहे.
तरी वरील कार्यालयीन वेळेमध्ये कोणतेही कार्यालय बंद असल्याचे नागरीकांचे निदर्शनास आल्यास त्यांनी गट विकास अधिकारी, पंचायत समिती, गडचिरोली यांचे कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 07132-295933 वर संपर्क साधावा. तसेच पंचायत समिती, गडचिरोली कार्यालयातील तक्रार नोंदवहीमध्ये तशी नोंद करावी, असे गट विकास अधिकारी पं.स. गडचिरोली मुकेश एस. माहोर यांनी कळविलेले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा