राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत पुण्यशोक अहिल्याबाई होळकर खाजगी रोपवाटीका योजनाचे प्रशिक्षण संपन्न.

गडचिरोली : - दि.15: राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत पुण्यशोक अहिल्याबाई होळकर खाजगी रोपवाटीका योजना अंतर्गत जिल्हयासाठी एकूण 22 रोपवाटीकाचे लक्षांक प्राप्त होते. तालुकास्तरावर अर्जाची सोडत पध्दतीने निवड होऊन मार्गदर्शक सुचनानुसार 22 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.
      
निवड करण्यात आलेल्या सर्व लाभार्थ्यांचे प्रशिक्षण दिनांक 12 डिसेंबर 2020 रोजी सकाळी  11.00 वाजता Google Meet द्वारे  ऑनलाईन आयोजित करण्यात आले. सदर प्रशिक्षणास एकुण 65 प्रशिक्षणार्थीनी भाग घेतला. यामध्ये निवड केलेले शेतकरी, संबधित कर्मचारी व अधिकारी यांनी भाग घेतला. या प्रशिक्षणास प्रशिक्षक म्हणुन हेमंत जगताप, तंत्र प्रशिक्षक, भारतीय कृषि कौशल्य परिषद, भारत सरकार हे लाभले . यावेळी त्यांनी योजनेमध्ये अर्ज करणे, योजनेचे निकष, लाभार्थी प्राधान्य व निवड, शेडनेट उभारणी, प्लास्टिक टनेल आराखडा, रोप निर्मिती व विक्री बाबत सखोल मार्गदर्शन केले.
       
या प्रशिक्षणास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषि उपसंचालक अरुण वसवाडे, तंत्र अधिकारी ( फलोत्पादन) गणेश बादाडे, तंत्र सहाय्यक रेवाराम भेंडारकर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.