महाडीबीटी पोर्टल योजना- अर्ज एक योजना अनेक.

गडचिरोली : - दि.28:कृषि विभागाने आता महा-डीबीटी पोर्टल वर “शेतकरी योजना”या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोईकरीता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसीत केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र देण्यात आले असुन शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबी करीता अर्ज करावयाचा आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधुनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधारकार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे.
महा-डीबीटी पोर्टलचे http:/mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरीला “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:च्या मोबाईल संगणक/ लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र(CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातुन उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील. “वैयक्तीक लाभार्थी” म्हणुन नोंदणी करु इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणीत करुन घ्यावा लागेल. ज्या वापरकर्ताकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमुद करुन त्यांना योजनासाठी अर्ज करता येईल. अश्या अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापुर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करुन प्रमाणीत करुन घ्यावा लागेल. त्याशिवाय त्यांना अनुदान वितरण करण्यात येणार नाही.

पोर्टलवरील प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी, पुर्व संमती देणे, मोकातपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इत्यादी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.
           
महा-डीबीटी पोर्टलवर माहीती भरण्याची कार्यवाही सुरु झालेली आहे. यापुर्वी अर्जदाराने माहीती भरली असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकामध्ये शेतकरी बदल करु शकतात. ज्या शेतकरी बांधवानी महा-डीबीटी पोर्टलवर कृषि विषयक योजनाचा लाभ मिळण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल त्यांनी दिनां‍क 31 डिसेंबर 2020 अखेर पर्यत आपले अर्ज पोर्टलवर भरावे. या तारखेपर्यत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राहय धरले जातील. तरी आवाहन करण्यात येते की, सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करावी, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.