मुलचेरा तालुक्यातील येल्ला गावातील भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आविस मध्ये जाहीर प्रवेश.
माजी आमदार दीपक दादा आत्राम व जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून केली सत्कार.
मुलचेरा : - तालुक्यातील ग्राम पंचायत, येल्ला अंतर्गत असलेल्या गावातील भाजप व राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी माजी आमदार व आविसचे नेते दीपक दादा आत्राम व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्यावर विश्वास ठेवून सामूहिक रितीने भाजप व राष्ट्रवादी पक्षाला रामराम करून आदिवासी विध्यार्थी संघामध्ये जाहीर प्रवेश केले.
ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात व क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे गाठी भेटीसाठी येल्ला क्षेत्रात माजी आमदार दिपकदादा आत्राम व जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दौरा केले.
या दौऱ्यात भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी पक्षावर नाराज असलेल्या श्री.लिंगा टेकुलवार, सौ.आशा गुलाब उराडे, रत्नमाला दशरथ सातपुते, गणपत टेकुलवार, सुखदेव अलोने, सागर पनेमवार, मधुकर पनेमवार, बंडू पनेमवार, सत्यवान टेकुलवार, संजय पनेमवार, भीमराव टेकुलवार, भीमा टेकुलवार, सोमा टेकुलवार, निरंजय टेकुलवार आदी कार्यकर्त्यांनी आदिवासी विध्यार्थी संगात प्रवेश घेतले. पक्ष प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे माजी आमदार मा.दिपकदादा आत्राम व जि.प.अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांनी शाल व श्रीफळ देऊन संघात प्रवेश घेतले.
यावेळी आदिवासी विध्यार्थी संघ लगामचे सरपंच श्री.मनीष मारटकर, माजी सरपंच श्री.पिंटूभाऊ कुसनाके, श्री.जुलेख शेख, प्रशांत गोडसेलवार, राकेश सडमेक आदी आविसाचे कार्यकर्ते उपस्थीत होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा