राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त एटापल्ली येथे रक्तदान शिबीर.

दिक्षा झाडे - तालुका प्रतिनिधी, एटापल्ली
एटापल्ली : - दिनांक 19/12/2020 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान सप्ताहाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एटापल्ली तर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले, ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथील या शिबिरास रक्त दात्यानी उस्फूर्त प्रतिसाद दिले. 

तब्बल 46 इच्छुकापैकी ईशांक दहागावकर, मनिष दुर्गे, शिवाजी मडावी, संदेश गुरनुले, सलीम शेख, रोशनी वैद्य, मनिषा, राजु नरोटे, लक्ष्मण नरोटे, देवाजी हिचामी, नागेश हिचामी, अंकित नरोटे, रामदास कुमोटी, ज्ञानेश्वर कुमोटी, दिलीप गावडे, सचिन गड्डमवार, अमित वासनिक, प्रशांत कोकुलवार, संदिप जंबोजवार, प्रथमेश ऊपगन्लावार, वीस रक्तदात्यानी रक्तदान केले. इतरांची तांत्रिक कारणामुळे निराशा झाली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एटापल्लीचे तालुकाध्यक्ष दौलतराव दहागावकर यांनी रक्तदान शिबीराकरिता आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एटापल्लीचे शहर अध्यक्ष विजय अतकमवार, तालुका संघटनसचिव विनोद पत्तीवार, तालुका सचिव लक्ष्मण नरोटे, राजु नरोटे सरपंच जांबीया, मिथुन जोशी युवा जिल्हा उपाध्यक्ष, पंकज पुंगाटी युवा शहर अध्यक्ष,आदी पदाधिकाऱ्यांनी रक्तदात्यांंना प्रवृत्त केले,

शिबीराचे यशस्वीतेसाठी संभाजी हिचामी आदिवासी सेल तालुकाध्यक्ष, प्रशांत कोकुलवार ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष, निर्मलाताई हिचामी महिला तालुकाध्यक्षा, शंकर करमरकर सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष, सचिन गड्डमवार युवा तालुका सचिव, मेस्सो पाटील पदा, संदिप वैरागडे ,दिलीप गावडे, आदीनी उपस्थित राहून सहकार्य केले ,रक्तसंक्रमण पेढी अहेरीचे डॉ रवी वाठोरे, निखील कुमार तकुंडपर्ती आणि त्यांच्या चमू, तसेच ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथील चमूने आपले कर्तव्य चोखपणे बजावत  सहकार्य केले. रक्तदान शिबिर यशस्वी रित्या पार पडले त्याबद्दल दौलत दहागावकर तालुकाध्यक्ष रा कांँ पार्टी एटापल्ली यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.