ग्रामपंचायतीचा निवडणूकासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रणालीद्वारे.

गडचिरोली : - दि.15: मा. राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांनी राज्यातील 14,234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणुक कार्यक्रम घोषित केला आहे. गडचिरोली जिल्हयातील काही ग्रामपंचायतींचा यात समावेश असून निवडणुक जानेवारी 2021 मध्ये होणार आहे.
        
ग्रामपंचायतीच्या मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेल्या सर्व मागासवर्गीय उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया ही पुर्णत:ऑनलाईन झालेली असून जात प्रमाणपत्रांची पडताळणी करून जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करणेची प्रक्रिया दिनांक 1 डिसेंबर 2020 पासून पुर्णत: ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात आलेली आहे. 
        
या ऑनलाईन प्रक्रियेत अर्जदाराने ऑनलाईन अर्जातील सर्व आवश्यक माहिती भरून तसेच आवश्यक सर्व दस्तावेज स्कॅनकरून अपलोड करणे व तदनंतर ऑनलाईन फी भरून ऑनलाईन भरलेला अर्ज, ऑनलाईन पैसे भरल्याची पावती व सोबत सर्व मुळ दस्तावेज व त्याच्या छायांकीत प्रतीसह समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत विहीत मुदतीत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
           
करिता जात प्रमाणपत्र पडताळणीसाठीचा आपला अर्ज या वेबपोर्टलवर परिपुर्ण माहितीसह भरून व आवश्यक सर्व दस्तावेज अपलोड करून ऑनलाईनवर सबमिट करावेत व तदनंतर त्यांची प्रिंट घेवून पुर्वीप्रमाणेच विहीत कार्यपध्दतीने मा. जिल्हाधिकारी अथवा निवडणुक अधिकारी यांचेमार्फत समिती कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावेत.जुन्या पध्दतीने हस्तलिखीत व ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
            
तसेच ज्या मागासवर्गीय उमेदवारांनी माहे फेब्रुवारी व मार्च 2020 मध्ये याच निवडणुकीकरीता समितीकडे ऑफ लाईन अर्ज सादर केलेले आहेत त्या सर्व उमेदवारांना परत नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. परंतु,ज्या उमेदवारांनी त्यावेळी जात प्रमाणपत्राऐवजी नॉनक्रिमिलीयर प्रमाणपत्र सादर केलेले होते, त्यांचे अर्ज समितीने रद्द ठरविलेले असून ते नस्तीबध्द केलेले आहेत.असे उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, राजेश शा. पांडे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.