पंचायत समिती कुरखेडा यांचे जनतेला सूचना.
गडचिरोली : - दि.16: कुरखेडा तालुक्यातील सर्व जनतेला याद्वारे सुचित करण्यात येते की, पंचायत समिती कुरखेडा अंतर्गत सर्व शासकीय कार्यालय (पंचायत समिती कार्यालय,जलसंधारण उपविभाग कार्यालय,ग्रापापु उपविभाग कार्यालय , एबविसेयो कार्यालय) यांची वेळ सकाळी 09.45 ते 06.15 निश्चीत आलेली आहे. नागरिकांना आवश्यक शासकीय सुविधा उपलब्ध करुन देतांना सदर कार्यालयीन वेळेत शासकीय कार्यालयात भेट द्यावी.दरम्यानच्या काळात कोणतेही कार्यालय कुलुपबंद/र्निमनुष्य असल्यास त्याची तक्रार दुरध्वनी क्रमांक 07139-245428 या क्रमांकावर करण्यात यावी.
तसेच प्राथमिक /माध्यमिक शाळा, अंगणवाडी केंद्रे, ग्रामपंचायती,प्राथमिक आरोग्य केंद्र,प्राथमिक आरोग्य पथक व पशुवैद्यकीय दवाखाना, यांच्या वेळा वेगवेगळया ठरवून दिलेल्या असल्याने सदर वेळेबाबतचे वेळापत्रक पंचायत समिती कुरखेडा कार्यालयाचे नोटीस बोर्डवर तसेच www.zpgadchiroli.org या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या आहे.
सोबतच शक्य असल्यास सदर तक्रारीच्या अनुषंगाने घेतलेले छायाचित्रे व इतर पिडीएफ फाईल सह संबधित कार्यालयास लेखी तक्रार करावी, असे आवाहन गट विकास अधिकारी, पंचायत समिती कुरखेडा श्रीमती अनिता तेलंग, यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा