धनश्री ग्रुप आलापल्ली द्वारे जीवनावश्यक वस्तूंचे वितरण.
सामाजिक कामात नेहमी अग्रेसर, ध.ग्रू. मुख्य संचालक राजअनिल पोचमपल्लीवार.
अहेरी : - धनश्री ग्रुपचे मुख्य संचालक तथा न्यूज-24 मराठीचे उपविदर्भ संपादक यांचे हस्ते आज 17/12/2020 रोजी नागेपल्ली येथील गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. कोरोनामुळे बरेच कुटुंब आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडली आहे. दैनंदिन खर्च जीवनावश्यक गोष्टी परवडेनासा झाले आहेत. कित्येक लोकांचे रोजगार बंद झाले असून काही लोकांना पोटासाठी जगणे ही कठीण ठरले आहे. अशावेळी धनश्री ग्रुपचे मुख्य संचालक राजअनिल पोचमपलीवार त्यांच्या बाधा आपल्या मनात व्यक्त करत, नागेपल्ली येथील अत्यंत गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
यावेळी धनश्री ग्रुपचे संचालक गौरव भगत सदस्य वसंती मडावी, जीवनकला कुसणाके, प्रतिक्षा दुर्गे, शालू केशनवार आधी गावकरी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा