मुल मध्ये वाढत्या अवैध दारू विक्रीवर आळा घाला - उलगुलान संघटनेचे शाखाध्यक्ष निखिल वाढई यांची मागणी.
पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन-मुल, जि.चंद्रपूर यांना निवेदन.
चंद्रपूर/मुल : - चंद्रपूर जिल्ह्याची दारू बंदी असून सुद्धा मुल तालुक्यामध्ये अवैध दारू विक्रीचे मोठया प्रमाणात वाढ झाल्यामुळे अनेक गोरगरिब जनता दारूच्या वेसनी होऊन आर्थिक बाजूने दुर्बळ होत आहे. शासनाने दारू बंधी करण्यामागचा हेतू येथील युवक तसेच दारूच्या वेसनी जाऊन दारिद्रयाकडे वळलेल्या जनतेला आपले जीवन पून्हा सन्मानाने जगता यावे हा होता.
परंतु दारूबंदी घोषित झाल्यानंतर प्रशासनाचा याकळे पाहिजे तितके लक्ष होत नसल्याने अवैध दारू विकणारे तसेच घेणारे यांची संख्या फोफावली आहे. दारूबंधी ही अवैध काम करणाऱ्यासाठी लागलेली लाट्रीच आहे. याचा पुरेपूर फायदा या अवैध विक्रेत्यांना होत असून आज यांच्याकडे लाखोची संपत्ती आहे. या संपत्तीची चौकशी व्हावी. आजपर्यंत ज्यांच्या वर दारू च्या कारवाही झाल्या आणि जे तळी पार आहेत त्यांची चौकशी व्हावी, हा पैसा गोरगरीबाचा पैसा आहे. अवैध दारू विक्रेते वाटेल ते किंमत आकारून वेसनाधीन झालेल्या व्यक्तीचा एक प्रकारे आर्थिक शोषण करीत आहे. म्हणून यांची दखल घेणे आता आवश्यक झाले आहे.
मुल तालुक्यात अवैध विक्रेत्यांवर पोलीस प्रशासनाने गुन्हा सिद्ध करून दिला का असा मोठा प्रश्न जनतेला पडलेला आहे. अनेक तरुण युवक व नाबालिक मुले लवकरात लवकर पैसे कमवाच्या लोभापायी दारू विक्रीचा नांंदी जात आहे. त्यामुळे युवा पिढी व नाबालिक मुले यांचा भविष्याचा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
दारूची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत असून पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. पोलीस प्रशासन इतका सक्रिय असून सुद्धा अवैद्य दारू मोठ्या प्रमाणात येत कशी आहे व अवैध दारूच्या हीस्स्यामध्ये पोलिसांचं काही हात तर नाही ना असा प्रश्न जनतेला पडलेला आहे. या अवैध दारू विक्रीमुळे सामान्य जनता भरडली जात आहे. यात मूल पोलिस स्टेशनची भूमिका बघ्याची आहे हे सध्याच्या परिस्तितीवरून दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस विभागाने अवैध धंद्यावर कारवाही करावी अन्यथा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर गांधी चौक येथे सामान्य जनतेला सोबत घेऊन धरणे आंदोलन करण्यात येणार असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला .
निवेदन देतांना उलगुलान संघटनेचे शाखाअध्यक्ष निखिल वाढई, उपाध्यक्ष प्रणित पाल, सचिव सुजित खोब्रागडे, आकाश येसनकर, रोहित शेंडे, अक्षय दुंमावार, साहिल मेश्राम, प्रणय रायपूर, हर्षल भुरसे, सुमित शेंडे, राकेश मोहूर्ले, तसेच अनेक कार्यकते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा