आलापल्ली येथील प्रचार सभेत नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी पदवीधरांना ना. विजय वडेट्टीवार यांचे आवाहन.

गडचिरोली : - आज आलापल्ली येथील सतीश मंगल कार्यालयात महाविकास आघाडीच्या घटक पक्षाद्वारे आयोजित अँँड. अभिजित वंजारी यांच्या प्रचार सभेत ना.विजय वडेट्टीवार यांनी अध्यक्ष स्थानावरून म्हणाले की, गेल्या ४२ वर्षापासून भाजपचा उमेदवार नागपूर पदवीधर मतदार संघात निवडून येत आहे. भाजपचा वर्चस्व असलेल्या या मतदार संघात पदवीधरांचे प्रश्न खरेच सुटले काय ? असा प्रश्न पदवीधर मतदारांनी आता विचारणे गरजेचे आहे. त्यासाठी येत्या १ डिसेंबरला होणाऱ्या नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आदिवासी विद्यार्थी संघटना, पिरिपा (कवाडे गट), रिपाई (गवई गट) आणि सर्व मित्र पक्षांच्या वतीने महाविकास आघाडीचे शिक्षण क्षेत्रातील जाण असलेले अँँड. अभिजित गोविंदराव वंजारी तरुण चेहरा नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघाच्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून दिला आहे. पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी महाविकास आघाडीने दिलेल्या बहुजन चेहऱ्यास विधान परिषदेत पाठविण्याचे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन म...