नोंदणी केलेल्या पदविधर मतदार कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तीक रजा - जिल्हाधिकारी,गडचिरोली.
गडचिरोली : - दि.25: नागपूर विभाग पदविधर मतदारसंघाची व्दिवार्षिक निवडणूक-2020 च्या निवडणूक अनुषंगाने सर्व पदविधर मतदारांना सुचित करण्यात येते की मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे कडून नागपूर विभाग पदविधर मतदार संघाची व्दिवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. सदर निवडणूकीचे मतदान दिनांक 01 डिसेंबर रोजी होणार आहे.
या निवडणूकीसाठी मतदार म्हणून नोंदणी झालेल्या सर्व असलेल्या पदवीधर मतदारांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा अनुज्ञेय आहे. सदरची रजा ही कर्मचा-यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार आहे. तरी या निवडणूकीमध्ये पदविधर मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी,
नागपूर विभाग पदविधर मतदार संघ तथा जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा