मौ गोपणार ग्रामस्थांची उप पोस्टे लाहेरीला भेट आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा - अविनाश नळेगावकर.

गडचिरोली/भामरागड : - मौ गोपणार येथील संपूर्ण ग्रामस्थांनी उप पोस्टे लाहेरीला भेट दिली. यावेळी गावातील स्त्री-पुरुष अबालवृद्ध सर्वांनी उपस्थीती दर्शवली. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांचे संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली यंदाची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत या अभिनव उपक्रमाचा प्रत्यय पुन्हा एकदा लाहेरी पोलीस स्टेशनला दिसून आला. 

अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंढे, व उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली उप पोलीस स्टेशन लाहेरी येथे मौ गोपणार येथील ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितांची बैठक आयोजित करण्यात आली. प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अविनाश नळेगावकर यांनी सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा तर दिल्याच परंतु विविध शासकीय योजनांची माहिती देऊन जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. 

उपस्थितांना शालेय साहित्य, जीवनावश्यक वस्तू वाटप करून दिवाळी फराळाचा कार्यक्रम पार पाडला.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी पोहवा तुकाराम हिचामी, शालू नामेवार, अरुण टेकाम, पो ना फिरोज गाठले, वर्षा डांगे, गाव दत्तक अंमलदार पो शी रत्नमाला जुमनाके, पोशी प्रेमीला तुलावी, ईश्वरलाल नैताम, संदीप आत्राम, सुजाता आत्राम, शोभा गोदारी, पुरुषोत्तम कुमरे, अरुणा आत्राम, अभिषेक पिपरे, नितीन कुमरे, चिरंजीव दुर्गे, सोनाली नैताम, योगिता हिचामी, नितीन जुवारे, मोहिन मानकर यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.