संविधान दिन साधेपणाने साजरे करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन रॅली व मिरवणूकीला परवानगी नाही.
गडचिरोली : - दि.25: जिल्हयात कोविड-19 विषाणूची साथ वेगाने वाढत असून, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना सर्व संबंधित विभागामार्फतीने उक्त संदर्भ पत्रातील निर्देशाप्रमाणे सुरु आहे. अशा परिस्थितीत मिरवणूक तथा रॅलीचे आयोजन करण्यास परवानगी देणे शक्य नाही. संविधान दिनानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात दि. २६ नोव्हेंबर रोजी कोणत्याही रॅली/मिरवणूक इत्यादीची परवानगी नाकारण्यात येत आहे. असे प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा