ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहिर.

गडचिरोली : - दि.26: माहे एप्रिल, 2020 ते जून, 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या व नव्याने स्थापित झालेल्या तसेच  माहे जुलै, 2020 ते डिसेंबर, 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच  नव्याने स्थापित   अशा एकूण 362 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी भारत निवडणूक आयोगाने दिनांक 25 सप्टेंबर, 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. त्याकरीता मतदार यादीचा  प्रभागनिहाय विभाजन  करण्याचा कार्यक्रम जाहिर केला आहे.

यामध्ये मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनां‍क 25/09/2020 असा आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी  प्रसिद्ध करण्याचा दिनांक मंगळवार, दि. 01/12/2020 आहे. हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी मंगळवार दि. 01/12/2020 व सोमवार दि. 07/12/2020 आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे गुरूवार दि. 10/12/2020 असणार आहे. एकुण ग्रामपंचायत संख्या 457 पैकी एकुण निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती 362 आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.