उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मुल येथे बालरोग तज्ञ व ECG सोय करा- उलगुलान संघटनेची मागणी.

चंद्रपूर/मुल : - उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मुल याठिकाणी मूल तालुक्यातील बरेच रुग्ण येत असतात. मुल तालुक्यामध्ये बालरोग तज्ञ नसल्यामुळे लहान मुलांना किरकोळ आजारासाठीही चंद्रपूरला न्यावे लागते. त्याचप्रमाणे मुल ग्रामीण रुग्णालयात ईसीजीची सोय नसल्यामुळे रुग्णांना आर्थिक व मानसिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच वेळेवर उपचाराअभावी कित्येक रुग्णांना आपला जीवही गमवावा लागला आहे. ही बाब अतिशय गंभीर असून मुल उपजिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ञ व ECGची नितांत आवश्यकता आहे.तरी तात्काळ सदर मागणीची पूर्तता करावी याकरिता उलगुलान संघटना शाखा मुल द्वारा उपविभागीय अधिकारी मूल यांना निवेदन देण्यात आले.
    
जर वरील मागणी पूर्ण झाली नाही तर उलगुलान संघटना ग्रामीण रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करणार असा इशारा उलगुलान संघटने द्वारा देण्यात आला. निवेदन देताना उलगुलान संघटनेचे शाखा अध्यक्ष निखिल वाढई, उपाध्यक्ष प्रणित पाल, आकाश येसनकर, रोहित शेंडे, अक्षय दुमावार, वतन चिकाटे, साहिल खोब्रागडे तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.