घरकुल योजना व सिंचन विहीर योजनांचे रखडलेले अनुदान त्वरीत द्या - दौलत दहागावकर तालुकाध्यक्ष रा कांँ पार्टी - एटापल्ली यांची मागणी.

गडचिरोली/एटापल्ली : - शासनाच्या विविध योजनांं पैकी जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या 1) रमाई आवास योजना 2)आदिम जमाती आवास योजना सन 2018-2019-2020 साली मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नसल्याने, आर्थिक- मानसिक त्रास सहन करावा लागत असून काही लाभार्थी उघड्यावर पडले आहेत. आपली जुनी झोपडी पाडुन नवीन घरकुलाचे काम सुरु केले. मात्र अनुदान न मिळाल्याने काम अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे ते ''घर का ना घाट का "या परिस्थितीत आहेत. 

तसेच 1)बिरसामुंडा कृषी क्रांती योजना 2) डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमान योजना अंतर्गत सिंचन विहीर योजनांचे विहीर बांधकाम पूर्ण होऊन देखील सबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या दिरंगाई मुळे दुसऱ्या टप्प्यातील अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे सिंचन विहीर लाभार्थी देखील अडचणीत सापडले आहेत. साहित्यांचे पैसे, मजुरांचे पैसे देणे असल्याने कुचंबणा होत आहे. 

सदर अडचण लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एटापल्लीचे तालुकाध्यक्ष दौलतराव दहागावकर यांनी मा. मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद- गडचिरोली यांच्याकडे त्वरित अनुदान मिळण्यास संवर्ग विकास अधिकारी एटापल्ली तर्फे निवेदन देण्यात आले. 

यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव लक्ष्मण नरोटे, राजू नरोटे सरपंच जांबिया, वासामुंडी येथील कार्यकर्ते दिलीप गावडे, रतन मडावी, तेजराव गावडे, दिनेश गावडे करण मडावी, दिवाकर गावडे हे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.