आलापल्ली येथील प्रचार सभेत नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी पदवीधरांना ना. विजय वडेट्टीवार यांचे आवाहन.
गडचिरोली : - आज आलापल्ली येथील सतीश मंगल कार्यालयात महाविकास आघाडीच्या घटक पक्षाद्वारे आयोजित अँँड. अभिजित वंजारी यांच्या प्रचार सभेत ना.विजय वडेट्टीवार यांनी अध्यक्ष स्थानावरून म्हणाले की, गेल्या ४२ वर्षापासून भाजपचा उमेदवार नागपूर पदवीधर मतदार संघात निवडून येत आहे. भाजपचा वर्चस्व असलेल्या या मतदार संघात पदवीधरांचे प्रश्न खरेच सुटले काय ? असा प्रश्न पदवीधर मतदारांनी आता विचारणे गरजेचे आहे.
त्यासाठी येत्या १ डिसेंबरला होणाऱ्या नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आदिवासी विद्यार्थी संघटना, पिरिपा (कवाडे गट), रिपाई (गवई गट) आणि सर्व मित्र पक्षांच्या वतीने महाविकास आघाडीचे शिक्षण क्षेत्रातील जाण असलेले अँँड. अभिजित गोविंदराव वंजारी तरुण चेहरा नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघाच्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून दिला आहे. पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी महाविकास आघाडीने दिलेल्या बहुजन चेहऱ्यास विधान परिषदेत पाठविण्याचे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी केले.
पुढे बोलताना ना. वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीच्या वतीने जुनी पेन्शन योजना व कायम विनाअनुदानित शाळांचा प्रश्नावर कॅबिनेट मध्ये निर्णय करून विधान भवनात चर्चा करून ठोस निर्णय घेणार असल्याचे सांगितले. गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण सहा टक्क्यावरून १५ टक्क्यावर करण्यासाठी येत्या १५ ते २० दिवसात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जि.प. अध्यक्ष अजय कंकड़ालवार यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना म्हणाले की, भाजपचे यापूर्वीचे पदवीधराचे उमेदवार निवडून आल्यानंतर या भागात फिरकले सुद्धा नाही. या भागातील पदवीधरांच्या समस्या सोडवण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. बहुजनाचा चेहरा उच्च विद्या विभूषित पदवीधरांच्या प्रश्नांची जाण असणारा व प्राध्यापकांच्या व शिक्षकांच्या प्रश्नांची त्यांना जाणीव आहे. शैक्षणिक धोरणाविषयी त्यांना माहिती अवगत आहे. असे महाविकास आघाडीचे उमेदवार अँँड. अभिजीत वंजारी असून सलग तीन वेळा सीनेट सदस्य राहिले आहेत. शैक्षणिक क्षेत्राविषयी त्यांचा अनुभव चांगला आहे. त्यामुळे यावेळी पदवीधरांनी अँँड. वंजारींच्या नावासमोर १ क्रमांक पसंतीक्रम दर्शवून त्यांना विजयी करण्याच्या आवाहन उपस्थितांना केले.
माजी आ. डॉ नामदेव उसेंडी यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर कडाडून टीका केली. पदवीधरांच्या नावावर राजकारणात मोठे होऊन केंद्रीय राजकारणा पर्यंत पोहोचल्या नंतरही अनेक विरोधी नेत्यांनी पदवीधरांच्या समस्या मात्र सोडवल्या नाही असा आरोप त्यांनी केला.
कार्यक्रमाचे संचालन आंनद अलोने तर आभार प्रदर्शन सुनील आंईचवार यांनी केले. यावेळी मंचावर जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, कांग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ नामदेव उसेंडी, शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपाल सुलवावार, जि. प. सदस्य अँँड. राम मेश्राम, जि. प. सदस्य रवींद्र शहा, जि. प. सदस्य संजय चरडूके, जि. प. सदस्य अजय नैताम, जि. प. सदस्य सुनिता कुसनाके, पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे, उप सभापती गीता चालुरकर, शिवसेनेचे अरुण धुर्वे, सुभाष घुटे, रियाज शेख आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा