स्वच्छ भारत अभियान मिशन अंतर्गत रामय्यापेटा येथील युवा पिढीचा पुढाकार.
अहेरी : - तालुका अंतर्गत येणाऱ्या रामय्यापेटा येथे स्वच्छ भारत अभियान उपक्रम राबविण्यात आला. संपूर्ण जग कोरोना महामारी सोबत लढत असतांना रामय्यापेटा येेेथील युवा पिढी मात्र अस्वच्छते पासून येणारे अनेक रोगांना टाळण्यासाठी स्वच्छ भारत अभियान हाती घेतले आहे. त्यासाठी युवा पिढी कडून संपूर्ण गावात साफसफाई करण्यात आला व गाव सुंदर दिसण्यासाठी रोडच्या कडेचे गवत कचरा काड्या ही साफ करण्यात आला. या उपक्रमातून रामय्यापेटाचे युवा पिढीच्या स्वच्छतेबदल आवड आणि संकल्प इतर गावांनाही मार्गदर्शन ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
या उपक्रमात सहभाग झालेले युवा, स्वच्छ भारत अभियान संत गाडगेबाबा रामय्यापेटाचे अध्यक्ष - विक्रम चटारे, उपाध्यक्ष - सचिन गुरनुले, सचिव - अनिता वाचामी, सुगंधा मडावी, रोजगार सेवक - दलसु मडावी सदस्य - रमेश वसाके, नितेश लेनगुरे, रमेश चातरे,संजय आदे, विश्वनाथ सिडाम, शामल मडावी, सारिका निकुरे, सोनाली आत्राम, रीना मडावी, ममता आत्राम आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा