जि.प.अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आलापल्ली येतील खांडरे परिवाराला आर्थिक मदत.
अहेरी : - तालुक्यातील आलापल्ली येथील नंदनी खांंडरे हिचे तब्येत ठिक नसल्याने दत्तामेघे दवाखाना, सावंगी येते भरती असून उपचार सुरू आहे. मात्र घरची परिस्थिती हलाकीचे असल्याने सावंगी येते येण्या -जाण्यास आर्थिक अडचण होत होते. सावंगी जाण्यास पैसे नसल्याने आज सदर मुलीची आई अर्चना संतोष खांंडरे यांनी मदत मागितले होते. तेव्हा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे, जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम, आलापली ग्रा.प. माजी सदस्य, सलीम शेख, वसंत आलाम, आविसचे शहर अध्यक्ष श्री.प्रशांत गोडसेलवार, राकेश सड़मेक, प्रकाश दुर्गे आदि उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा