सामाजिक दायित्वाचा लाहेरी पोलिसांकडून आदर्श नमुना.

शासकीय नोकरदारांनी सामाजिक दायित्व पार पाडण्यासाठी पुढे यावे - अविनाश नळेगावकर.
गडचिरोली/भामरागड : - उप पोस्टे लाहेरी येथील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सामाजिक दायित्व जपत हद्दीतील गावांना व्हॉलीबॉलचे वाटप केले. गडचिरोली जिल्ह्याची गणना ही मागास, गरीब आणि आदिवासी बहुल म्हणून केली जाते. त्यात भामरागड तालुक्यातील उप पोलीस ठाणे लाहेरी हा परिसर अतिमागास, पराकोटीचा गरीब आणि आदिवासी बहूल आहे. 

पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांचे मार्गदर्शनाखाली लाहेरी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर यांनी उप पोलीस स्टेशनला दत्तक गाव अंमलदार यांची नेमणूक केली. त्यानुसार प्रत्येक गावासाठी उपलब्ध संख्येनुसार एक किंवा दोन पोलीस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली. हे दत्तक गाव अंमलदार संबंधित गावच्या अडी अडचणी, गावामध्ये कायदा -सुव्यवस्था व शांतता अबाधित ठेवणे, विविध शासकीय योजनांची माहिती संबंधित गावकाऱ्यां पर्यंत पोहचवणे व पात्र लाभार्त्यांचा शोध घेऊन त्यांचे विहित नमुन्यात अर्ज घेऊन ते संबंधीत विभागाकडे पोहचवणे ईतर कामे पार पाडतात. यामुळे प्रशासकीय कामकाजात सुरळीतपणा, वेग याचबरोबर अशिक्षित व गरीब आदिवासी बांधवाना एक खिडकी सेवा प्रमाणे पोलीस उपलब्ध होऊ लागले. 

यातूनच सामाजिक दायित्व या  संकल्पनेला सुरुवात झाली व पोलीस स्टेशन हद्दीतील तरुणांमध्ये खिलाडूवृत्ती व नेतृत्वगुण वृद्धिंगत करण्याचे उद्देशाने सांघिक खेळांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश समोर ठेवून प्रत्येक गावाला किमान एक व्हॉलीबॉल देण्याचे निश्चित करण्यात आले. 

यानुसार प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर यांनी 3 व्हॉलीबॉल व नेट, पोउपनी झिंजुर्डे-1, पोहवा तुकाराम हिचामी - 2, मपोना वर्षा डांगे-1, पोशी रेश्मा गेडाम-1, नितीन जुवारे -1, चिरंजीव दुर्गे-1, कल्पना दवणे-1, रत्नमाला जुमनाके-1, मोहिन मानकर-1, वैशाली चव्हाण व फिरोज गाठले-1, सचिन सोयाम व सोनाली नैताम-1, अभिषेक पिपरे व शोभा गोदारी-1, प्रेमीला तुलावि व ईश्वर लाल नैताम-1, शालू नामेवार व पुरुषोत्तम कुमरे-1, प्रमाणे मौ. लाहेरी, मल्लम्पोडूर, कुकामेटा, मुरंगल, कोयर, भुसेवाडा, गुंडेनूर, बंगाडी, फोदेवाडा, कुव्वाकोडी, बिनागुंडा, मोरडपार, अलदांडी, गोपणार, लष्कर, होडरी येथील व्हॉलीबॉल टीमला व्हॉलीबॉल वाटप केले. 

यावेळी प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर यांनी सर्व पोलीस अमलदारांचे अभिनंदन केले व शासकीय नोकरदारांनी सामाजिक दायित्व म्हणून मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.