जिल्हा परिषद अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवार यांनी अहेरीचे तहसीलदार सोबत विविध समस्यावर केली चर्चा.

अहेरी : -  गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवार यांनी अहेरीचे तहसीलदार श्री ओंकार ओतारी यांच्याशी अहेरी तालुक्यातील विविध समस्यावार चर्चा करण्यात आले.
         
प्रामुख्याने प्राणहिता नदीकाठी वसलेले देवलमरी येतील कोळी बांधव गेल्या अनेक वर्षापासून प्राणहिता नदीत मच्छिमार करत आहेत. मात्र यावर्षी सदर नदीत तेलंगाणा राज्यातील तलाई गावातील कोळी बांधव जाळे टाकत आहेत व देवलमरी येतील मच्छिमार बांधवांचा विरोध करत हाकलत असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
     
त्यामुळे आज देवलमरी येतील कोळी बांधव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेवुन समस्या सांगितले असता जिल्हा परिषद अध्यक्षांनी सदर नागरिकांना सोबत घेवुन तहसील कार्यालय गाठून अहेरीचे तहसीलदार श्री ओतारी साहेब यांच्याशी चर्चा केली. तेव्हा सदर प्रकरणाचे लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन तहसिलदार यांनी दिले. त्यानंतर अनेक महिन्या पासून रखळलेल्या रेतीघाट, कुटुंब अर्थसहाय्य व श्रावणबाळ अनुदाना बाबत सुध्दा चर्चा करण्यात आले.
         
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे, जिल्हा परिषद सदस्या कु.सुनीताताई कुसनाके, किस्टापुर ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच श्री.अशोक येलमूले, देवलमरी येतील गंगाराम तोकला, सत्यम तोकला, गोंगलू तोकला, रवि तोकला, गणेश तोकला, सत्यम मंचर्ल्ला आदि उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.