आलापल्ली चौकातला रस्ता बनला गाड्यांचे वाहनतळ.

श्रीनिवास बोमनवार - तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी : - आलापल्ली ग्रामपंचायत पासुन ते चंद्रपूर-नागेपल्ली रोड पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी चार चाकी वाहने उभे राहत असल्याने हा रस्ता वाहनतळच बनल्याचे दिसून येत आहे. आलापल्ली हा शहर अहेरी तालुक्यातील मध्य भाग पडते तर आलापल्ली या मार्गावरून चार तालुक्यातील लालपरिसह (एसटी)  खासगी ट्रॅव्हल्स चारचाकी व दुचाकी वाहनांचे ये-जा सुरू असते. 
विशेषत: सकाळी ९ तेे सायंकाळी ५ वाजे पर्यंत या मार्गावरून ये-जा करणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होते. सतत रहदारीचा मार्ग असल्यामुळे नागरिकांना वाहतुकीच्या नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये अधिक भर म्हणून की काय, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चार चाकी वाहने उभ्या ठेवले जात आहेत. परिमाणे, वाहतूक कोंडीने विस्तृत धारण केले आहे. 
आलापल्ली बस्तानका जवळ ग्रामपंचायत कार्यालय असल्यामुळे  कार्यालय समोर विविध ग्रामीण क्षेत्रात जाणारे वाहनांची रांगी लागून असते. त्यामुळे कार्यालय कामासाठी ये-जा करणारे नागरिकांना दोन्ही बाजूने उभे असलेले वाहनांना पार करून येणे कठीण ठरले आहे. यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडताना भीतीच्या वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.