ग्राम पंचायत नागेपल्ली येथे 'भारतीय संविधान' दिवस साजरा.

संविधान दिवसाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!
ग्रामीण प्रतिनिधी झिमेला  
अहेरी/नागेपल्ली : - महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाला आजच्या दिवशी मान्यता प्राप्त झाली. त्यामुळे हा दिवस 'संविधान' दिवस म्हणून देशात साजरा केला जातो.

देशात स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता टिकून राहावी यासाठी हा दिवस साजरा केल्या जातो. भारतीय संविधान दिवसाच्या निमित्याने आज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व 'संविधान' वाचन करुन सर्वांनी संविधान शपत घेतले.

यावेळी ग्राम पंचायत नागेपल्लीचे ग्राम विकास अधिकारी एल.के. पाल, सामाजिक कार्यकर्ते किशोर दुर्गे, प्रकाश मोहूर्ले, ग्राम पंचायत कर्मचारी नामदेव वाघाडे, सुरेश येलमुले, अशोक कोडापे, अरुणा गुरनुले, मनोज भोयर, दिपक चौधरी आदी नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.