ग्राम पंचायतीच्या दुर्लक्षामुळे, दूषित दुर्गंध पाण्यापासून अनेक रोगांना आमंत्रण.

नाल्या नसल्यामुळे बारमाही रस्त्यातून वाहत असते पाणी.
श्रीनिवास बोमनवार - तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी : तालुका अंतर्गत येणाऱ्या  मद्दीगुडाम हा गाव किष्टापुर (वेल) ग्रामपंचायत अंतर्गत येते. मद्दीगुडाम पासून किष्ठापुर (वेल) ग्रामपंचायत पर्यंत १५ कि.मी चा प्रवास करून प्रत्येक वेळी तक्रार देणे शक्य नाही. तरी सुद्धा मद्दीगुडामचे नागरिकांनी अनेक वेळा त्यांच्या समस्या पाहणी करून त्या समस्यांच्या निवारण करण्यासाठी ग्रामपंचायत सचिवांना अनेक वेळा तोंडी व भ्रमणध्वनी द्वारे तक्रार देण्यात आले. मात्र ग्रामपंचायत सचिवांनी  मद्दीगुडाम या गावात जाऊन कधीही पाहणी केले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या गावात रोडच्या जिथे अत्यंत आवश्यक असते तिथे मुरूम टाकतात व जिथे रस्त्याच्या आवश्यकता नाही तिथे मात्र सिमेंट काँक्रीटचे  काम पूर्ण होऊन दिसते. 

या भोंगळ कारभारामुळे मद्दीगुडामचे एका वार्डात किमान १० वर्षापासून रस्त्यावर दूषित दुर्गंध पाणी वाहत आहे. मात्र ग्रामपंचायत  दरवर्षि मुरूम टाकून हात झटकतात. या वार्डातील हा रस्ता मेन रोडकडे जाण्याच्या मुख्य रस्ता असल्यामुळे दूषित व दुर्गंधी पाण्यातून नागरिकांना जावे लागते. या रस्त्याला नाल्या नसल्यामुळे स्नान, सांडपाणी इतर पाणी रस्त्यात बारा महिने साचलेले असते. या दूषित दुर्गंध पाण्यामुळे अनेक रोगांना आमंत्रित देण्यात येत आहे.

तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्यांकडे लक्ष देऊन रस्ता व नालीचा सिमेंट काँक्रिट बांधकाम करण्यात यावे व खुर्चीवर बसून गूगल मानचित्र बघून काम करणारे  सचिवांना विचारपूस करण्यात यावे असे मद्दीगुडाम नागरिकांची मागणी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.