निराधार पेंशन योजना, श्रावणबाळ योजना अंतर्गत येत असलेले रक्कम त्वरित जमा करा.

दिक्षा झाडे - तालुका प्रतिनिधी एटापल्ली
गडचिरोली/एटापल्ली : - तालुक्यापासून २ किमी अंतरावर येत असलेला जीवनगट्टा या गावात अनेक लोकांचे शासना तर्फे येत असलेले विधवा, वृद्ध पेंशन योजनेचे पैसे गेल्या ३ ते ४ महिन्यापासून खात्यात जमा होत नसल्याने त्वरीत जमा करण्याकरिता टायगर ग्रुप एटापल्लीच्या पुढाकाराने गावकऱ्यांसह तहसीलदार, एटापल्ली यांना निवेदन देण्यात आले. आधीच कोरोनाचा कहराने लोकांचा मनात भीतीचा घर घेऊन बसला आहे. त्यातच जन सामान्य माणसचे जगणं कठीण होत आहे, रोजी रोटी बंद असून सर्व मजुरी कामे ठप्प पडले आहे. मजुरी करून घर चालवणाऱ्यावर उपास मारीची वेळ आली आहे. अश्या वेळी जे विधवा, वृद्ध यांना शासना तर्फे मिळणारे निराधार पेंशन योजना व अन्य योजनेअंतर्गत येत असलेले पैसे देखील बंद होते, त्यामुळे यांच्यावर पण उपासमारीची वेळ आली. 

टायगर ग्रुप एटापल्लीचे सदस्य समस्या जाणून घेण्यासाठी जीवनगट्टा गावात गेले असता त्या गावातील लोकांनी प्रतिसाद देत समस्या सांगितले, टायगर ग्रुप सदस्यांनी त्याचे निवारण करण्याकरीता गावकऱ्यांसह तहसिल कार्यालय येथे गाठून तहसीलदार यांना निवेदन पत्र देण्यात आले. यावेळी टायगर ग्रुप एटापल्ली सदस्य व जीवनगट्टा गावातील गावकरी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.