आदिवासी व्यक्तींच्या विविध समस्यांचा निवारण करण्यासाठी, अहेरी काँग्रेस कमिटीचा पुढाकार.

श्रीनिवास बोमनवार तालुका प्रतिनिधी-अहेरी अहेरी : - तालुका कांँग्रेसचे अध्यक्ष श्री मुश्ताक हकीम हे अतिदुर्गम, अविकसीत, नक्षलग्रस्त क्षेत्रातील मौजा- मेट्टीगुडम, कोंजेड, कल्लेड, बिराडघाट, लोहा, ईत्यादी गावातील आदीवासी व्यक्तींच्या विवीध समस्याबाबत वनपरिक्षेत्र कार्यालय,देचली व वनपरिक्षेत्र कार्यालय, जिमलगट्टा येथे जाऊन वनपरिक्षेत्राधिकारी श्री कांम्बळे यांच्या सोबत चर्चा करण्यात आले. या क्षेत्रातील आदिवासी शेतकऱ्यांचे वनहक्काचे पट्टे आज १५वर्षाचा काळ होऊन सुध्दा मिळालेले नाही. सदर गावातील काही आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ट्रॅक्टर लाऊन नांगर करीत असतांना वनपरिक्षेत्र अधिकारी, देचली यांनी त्या आदीवासी शेतकऱ्यांना अडविले. परंतु या क्षेत्रातील आदीवासी शेतकऱ्यांचे म्हणने आहे की, सन १९९५-१९९६ व २००२-२००३ मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय,देचली ला काही असामाजिक तत्वाने जाळले. त्यामुळे त्यात त्यांचे अतिक्रमणा संबंधित पुरावे पुर्णपणे नष्ट झाले. तसेच ते संपूर्ण आदीवासी शेतकरी अशिक्षित असल्यामुळे वन-हक्काचे पुरावे कुठुन आणनार हा प्रश्न निर्माण झाला आह...