उलगुलान संघटना शाखा मुल-द्वारा भव्य रक्तदान शिबिर

चंद्रपूर/मुल : - कोविड-19 महामारीच्या काळात असंख्य कोरोना योद्धा आपल्या जिवाची पर्वा न करता या महासंकटाशी सामना करत आहेत. भारतातील प्रत्येक नागरिक स्वतःसोबत इतरांची सुद्धा काळजी करत आहेत. या महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासू शकते. उलगुलान संघटनाही देशहिताची व जनहिताची भावना लक्षात ठेवून आपलीही जबाबदारी म्हणून रक्तदानासारखे  महान कार्य आपल्या हातून घडावे याकरिता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. तसेच उलगुलान संघटना शाखा मुलचे अध्यक्ष निखिल वाढई, सुजित खोब्रागडे, रोहित शेंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
करिता बुधवार दिनांक २८ ऑक्टोंबर २०२० रोजी वेळ सकाळी ८ ते ४.०० वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करून या महामारीच्या संकटात सहकार्य करावे ही नम्र विनंती.

आयोजक :- राजूभाऊ झोडे
उलगुलान संघटना संस्थापक अध्यक्ष
तथा
उलगुलान संघटना शाखा :- मुल सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता

स्थळ
गांधी चौक मुल, निर्वाण ज्वेलर्स जवळ मुल, जिल्हा चंद्रपूर श्री गुड्डू रामटेके यांचे कॉम्प्लेक्स

संपर्क क्रमांक
८५३००८०९३८,
९९२१८१८०८५,
९१५६१९५०६३

चला रक्तदान मोहीम राबवूया
रक्तदान करून जीव वाचवूया
🩸🙏🩸🙏🩸🙏🩸🙏🩸🙏🩸

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.