नागेपल्ली येतील माँ दुर्गाला नवदुर्गा मंडळाकडून निरोप


गडचिरोली/अहेरी : - नागेपल्ली येथील प्रसिद्ध असलेले  नवदुर्गा मंडळ मागील अठरा-विस वर्षापासून माँ दुर्गाची प्रतिष्ठापना करत आहेत. येथील आजुबाजुच्या गावातुन दुर्गा उत्सव पाहण्यासाठी मोठ्या उत्साहाने हजारो भाविक येत असतात. परंतु यावर्षी कोरोना प्रादुर्भावमुळे मोठा उत्सव होऊ शकला नाही. दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम, रंगमंच कार्यक्रम, भक्ती  यासारखे अनेक कार्यक्रम राबविण्यात येत होते आणि दांडिया कार्यक्रमात उत्तम दांडिया खेळणाऱ्या विजेता चमुला पारितोषिक देण्यात येत होते. तसेच दरवर्षी देविचे विसर्जन सुध्दा मोठ्या थाटामाटात करत होते. परंतु यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे दुर्गा उत्सव व विसर्जन खुप साधेपणाने करण्यात आले. आज विसर्जन वेळी नवदुर्गा मंडळाचे सर्व सदस्य व भक्तगण उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.