अहेरी पोलिसांच्या कार्यवाहीत ६५ गोवंशाला जीवनदान व तीन ट्रक ताब्यात.



गडचिरोली/अहेरी - संतोष अग्रवाल - कार्यकारी संपादक

आज दि : - १०/१०/२०२० रोजी आष्टी-अहेरी महामार्गावर दिनानदी ते सुभाषग्रामच्या मधात पोलीसांनी 3 ट्रक मध्ये कत्तलीसाठी जाणाऱ्या 65 गोवंशाना दिले जीवनदान. रात्री 3 ते 3:30 च्या दरम्यान पोलिस बोरी येथे गस्तीवर असतांना तीन ट्रक क्र- T S-12-UC-9336, TS-12-US-8749 व MH-40-3317 हे आष्टी वरून अहेरी कडे येत होते, तेव्हा पोलिसांनी हात दाखवून थांबविण्यास सांगितले असता ट्रक चालकांनी ट्रक न थांबविता वेग वाढवून काही दुरीवर ट्रक थांबवुन अंधाराचा फायदा घेऊन तीनही ट्रक चालक पडून जाण्यास यशस्वी झाले. परंतु गाडीत झोपलेले दोन सफाईगार पोलिसांच्या हातात सापडले व ट्रकमध्ये तपासणी केले असता गोवंशाचे हातपाय बांधून कोंबून भरून असल्याचे आढळून आले.  
ट्रक चालक पळून गेल्याने पोलिसांनी दुसऱ्या चालकाची व्यवस्था करून घटनास्थळच्या जवळ असलेले बोरी येथील कांजीत 22 व रायपूरपॅच येथील कांजीत 47 गोवंशाना उतरविण्यात आले. त्यापैकी 4 गोवंश मृत्युमुखी पडले व काही गोवंशाची नाजूक स्थिती होती. त्यानंतर पोलिसांनी तीनही ट्रक आपल्या ताब्यात घेतला. यावेळी मौक्यावर बजरंग दलचे कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.
सदर प्रकरणातील दोन इसमांंवर महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम 1976 अनव्ये भा. द. वि. गुन्हा दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक मनिष कलवाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई व पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली
अहेरी येथील पोलीस उपनिरीक्षक, विनायक दळसपाटील करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.