भामरागड येथे विर बाबुराव शेडमाके जयंती दिवस समारोह
गडचिरोली/भामरागड : - दि- २१/१०/२०२० रोजी भामरागड नगर पंचायत क्षेत्रातील भामरागड, हेमलकसा, दुब्बागुडा, मेडपल्ली, हिंदभट्टी, कोयंगुडा, बेजुर आणि ताडगाव असे संयुक्त पध्दतीने विर बाबुराव पुल्लेसुर शहदत दिवस साजरा करण्यात आला. यावेळी भामरागड हद्दीत असलेला इलाका पारंपरिक गोटुल भुमीचा भुमीपूजन तसेच आदिवासी सप्तरंगी ध्वज फडकविण्यात आले. भुमीपूजन तिन भुमकल मिळुन पुजाविधी पुर्ण केलेत. कार्यक्रमाच्या सुरुवात विर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पूजन दीपप्रज्वलन आणि गोंडी स्वागत गीताने करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक श्री संदीप भांड पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन-भामरागड, श्री उकडे पोलीस उपनिरीक्षक, रामलु सडमेक, रामजी पुंगाटी, जोग उसेंडी, वामन उईके, अनवरशाह मडावी, वालु उईके, कुशल मडावी होते.
यावेळी आदिवासी प्रता, रुढी पारंपरिक, जल जंगल जमीन, आरोग्य, शिक्षण, आदिवासी गोटुल स्वरक्षण, होणारा धार्मिक आक्रमण, स्वच्छता इत्यादी विषयी भरभरून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात महिलांचा सहभाग अधिक होते. यावेळी निर्मला सडमेक, योगिता सडमेक, मिराबाई मडावी, लक्ष्मी मडावी, अपर्णा सडमेक, प्रिती विडपी, सुनिता मुडमा, जाणो कुडयामी, शिला, मंजुषा, चंदा महाका, शकुंतला, मंगला, सरिता आदि यांनी कार्यक्रमाची संपूर्ण तयारी केले. या कार्यक्रमात भुमीपूजन करण्यासाठी आदिवासी भुमकल तिरुमाल सु़दरदास सडमेक, गजु पोरतेट आणि दादा कुसराम उपस्थित होते.
कार्यक्रमाची शोभा सफल करण्यासाठी जयराम मडावी, शंकर आत्राम, राजु वड्डे, नासीर पठान, मुक्तीपथ तालुका प्रेरक आबिद शेख, यशवंत दब्बा, लालसु दुर्वा, जोग उसेंडी व इतर लोकांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचा प्रस्तावना इष्टाम सर केलेत, संचालन चिन्नु महाका (मुक्तीपथ) यांनी केले व शेवट समारोप दिनेश आर्कि यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा