जि.प अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे पुर्वीच्या ग्रामसेवकाची परत नियुक्त करण्यास ग्राम पंचायत,पल्ली येथील नागरीकांची मागणी



गडचिरोली/भामरागड : - भामरागड तालुक्यातील ग्राम पंचायत, पल्ली येते कार्यरत असलेले ग्रामसेवक एम. जे.सहारे यांना गट विकास अधिकारी यांनी अंतर्गत बदली करून श्री.मेश्राम यांना मागील जुन महिन्यात ग्राम पंचायत, पल्लीचे प्रभार दिले. परंतु श्री मेश्राम प्रभार घेतल्यापासुन सतत गैरहजर राहत असल्यामुळे ग्राम पंचायत, पल्ली येथील नागरिकांना त्रास सहन करावी लागत होता. त्यामुळे समस्त गावकरी व ग्राम कोष समिती अध्यक्ष यांनी मा. श्री. अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद अध्यक्ष यांना पूर्वीचे ग्रामसेवक श्री. एम.जे.सहारे यांना ग्राम पंचायत, पल्ली येते परत रुजू करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजुभाऊ चारुडुके, कांग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष मुस्ताक हकीम, रघुपती बापू नैताम,भावरसाय मांजी, संभारू हेमला, देवाजी तलांडी, सोमनाथ मडावी, इरपा उसेंडी, जगन्नाथ बाकडा, दिलीप मांजी, रामपूरी मांजी, हरिष हेमला, टिंगरी राणा, अर्जुन बाकडा, राजू बाकडा, श्रीकृष्ण मांजी, मनोज मांजी, दसरु राणा, राम मांजी, भाकचंद भाकडा, जितराय मांजी, रवींद्र उईके, बलराम राणा व  ग्रा.प.पल्ली येथील समस्त गावकरी व ग्राम कोष समिती अध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने निवेदन दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

नागेपल्ली येथील श्मशानभूमीवर अंतिम संस्कारसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर (वराहपालक) अतिक्रमणकारांचे जीवघेणे हल्ले.