उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पदे भरण्याकरिता तहसीलदार,अहेरी यांच्यामार्फत आरोग्यमंत्री यांना अहेरी तालुका काँग्रेसतर्फे निवेदन


श्रीनिवास बोमनवार : - तालुका प्रतिनिधी, अहेरी

अहेरी : - गडचिरोली जिल्हा हा अती मागासलेला व नक्षलग्रस्त जिल्हा असून या जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय सुरू आहे. या उपजिल्हा रुग्णालयात अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंच व मुलचेरा या पाच तालुक्यांचा समावेश आहे. या क्षेत्रात हिवताप, क्षयरोग, सिकलसेल आजार व माता मृत्यू, बालमृत्यू प्रमाण जास्त प्रमाणात असून या  रुग्णांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात तज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे गडचिरोली किंवा चंद्रपूर येते उपचार घेण्याकरिता 150 किलोमीटर जावे लागतो.
अहेरी उपजिल्हा रुग्णालयात मागील दोन वर्षापासून तज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त असल्यामुळे या परिसरातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने वेळ प्रसंगी रुग्णांना जिव दगावा लागते. अहेरी तालुका व आजूबाजूचे तालुके अतीमागासलेले तालुके असून या परिसरातील लोक हे दारिद्र्य रेषेखालील आपले जीवन जगत आहे. 
या परिसरातील लोकांना वेळेवर उपचार मिळण्याच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालय अहेरी येते विविध तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या अत्यंत गरज भासत आहे. यात वैद्यकीय अधिकारी (शास्त्रक्रिया-०१), वैद्यकीय अधिकारी(अस्तिरोग-०१), वैद्यकीय अधिकारी (भिषक-०२), वैद्यकीय अधिकारी (नेत्रा चिकिस्तक-०१), वैद्यकीय अधिकारी (मूत्ररोग तज्ञ-०१), वैद्यकीय अधिकारी ( स्त्रीरोग तज्ञ-०२), वैद्यकीय अधिकारी (भुल तज्ञ-०२) या तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती दहा दिवसापर्यंत करण्यात यावे. जर दहा दिवसांपर्यंत सदर पदे न भरल्यास अहेरी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय- अहेरी येथे आंदोलन करण्यात येईल असे अहेरी तालुका काँग्रेस अध्यक्ष मुस्ताक हकीम यांच्याद्वारे निवेदनातून जाहीर करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.