भाग्यश्रीताई आत्राम यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा


वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, मास्क व नोटबुकचे वाटप करण्यात आले

गडचिरोली/अहेरी :- माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचे आज 6 आक्टोंबर रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून अहेरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस  साजरा करण्यात आले.
     सर्व प्रथम राजवाड्यात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचा वाढदिवसाचा केक कापण्यात आले. यावेळी प्रामुख्याने आमदार धर्मराव बाबा आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर उपस्थित  होते. यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांना केक व मिठाई भरवून वाढदिवसाचे शुभेच्छा व आशीर्वाद दिले. तसेच यावेळी असंख्य चाहत्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांना हार, फुले व गुलदस्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव व मिठाई वितरित केले.
त्या नंतर नजीकच्या गाव चिंचगुंडी येथे विद्यार्थ्यांना नोटबुक-पेन आणि मास्क-सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच चिंचगुंडी ग्राम पंचायत कार्यालयाच्या परिसरात भाग्यश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते  वृक्षरोपणही करण्यात आले. 
      यावेळी रा.काँ. च्या शाहीन भाभी हकीम, पूर्वाताई दोंतुलवार, पुष्पाताई अलोने, आशाताई पोहणेकर, सारिका गडपल्लीवार,  ममता पटवर्धन, लक्ष्मण येरावार, श्रीनिवास विरगोनवार,श्रीकांत मद्दीवार, बुधाजी सिडाम, शैलेश पटवर्धन, नितीन दोंतुलवार, सुरेंद्र अलोने,महेश अलोने, श्रीनिवास मगडीवार, मखमुर शेख, राहुल गर्गम, आफ्रिदी सैय्यद, योगेश दंडिकवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.