नवरात्र उत्सवात भामरागड पोलीसांची दारू वाहतुकदारांवर कारवाई


गडचिरोली/भामरागड : - दि-१९/१०/२०२० रोजी सकाळी ०९:४५ वा एक इसम मौजा दुब्बागुडा येथुन भामरागड येथे हातभट्टी मोहा दारु घेऊन येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्री संदीप भांड यांना मिळाली. 
सदर माहीतीच्या आधारे श्री संदीप भांड यांनी पोलीस उपनिरीक्षक किरण उघडे सोबत नापोशि-गजानन राठोड, पोशि-रमेश पुंगाटी, विकास गुरनुले, राजु गुडमेवाड, अतेश मेश्राम, गितेश्वर बोरकुटे, गणेश मडावी यांना मौजा भामरागड येथील आय.टी.आय जवळ पाळत ठेवली असता दुब्बागुडा कडुन येणारा इसम नामे- लालसु वंजा मुहंदा, वय- ३० वर्ष, रा- जुव्ही, ता- भामरागड यांच्याकडील थैलीची तपासणी केली. सदर थैलीमध्ये प्लास्टिक कॅनमध्ये २०लिटर हातभट्टी मोहादारु अशी एकुण २०००/- रु किंमतीचा माल अवैधरित्या वाहतुक करत असतांना आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन, भामरागड येथे कलम- ६५(अ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे. 
गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना भामरागड पोलिसांनी नवरात्र उत्सव काळात श्री अंकीत गोयल-पोलीस अधिक्षक, श्री सोमय मुंढे-अपर पोलीस अधिक्षक-अहेरी, श्री डॉ.कुणाल सोनवणे-उपविभागीय पोलीस अधिकारी-भामरागड  तसेच श्री संदीप भांड-पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, भामरागड यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमुळे भामरागड परिसरातील अवैध दारु वाहतुकदारांना व विक्रेत्यांना चांगलाच चाप बसला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.