पोलिस-नक्षल चकमकीत ५ नक्षल ठार- गडचिरोली जिल्ह्यातील मोठी घटना


गडचिरोली/धानोरा : - धानोरा उपविभागांंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र ग्यारापती हद्दीतील कोसमी-किसनेली जंगल परिसरात पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया व पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांच्या नेतृत्वाखाली सी-६० चे कमांडो नक्षलविरोधी अभियान राबवित होते. त्यादरम्यान नक्षलवाद्यांनी पोलिस जवानांवर हल्ला केला. त्याचे प्रत्युत्तर देत सी-६० जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये ५ नक्षलवाद्यांना ठार करण्यात सी ६० जवानांना यश आले. ५ नक्षलवाद्यांपैैकी ३ महिलांंचा समावेश होता. तसेच घटनास्थळी नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.