ग्राम पंचायत,येरमनार येथे १५वा वित्त आयोगाचा "आमचा गाव, आमचा विकास" आराखडा संदर्भात कार्यशाळेचे आयोजन
गडचिरोली/अहेरी : - दिनांक 29 ऑक्टोबर 2020 रोजी,अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय येरमनार येथे सरपंच श्री बालाजी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली 15 वा वित्त आयोगाचा "आमचा गाव, आमचा विकास" आराखडा सन 2021-22 ते 2024- 25 पंचवार्षिक नियोजन आराखडा संदर्भात कार्यशाळा आयोजन करण्यात आला.
यावेळी सर्वप्रथम संत गाडगेबाबा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माला अर्पण करून कार्यशाळेला सुरुवात करण्यात आला. त्यानंतर गावामध्ये शिवार फेरी काडून, येरमनार ग्रा.पं.अंतर्गत येणारे मौजा - येरमनार, येरमनार टोला, गुर्जा खुर्द, मिचगुंडा, कोरेपल्ली, कवटाराम इयादी गावातील समस्यांवर चर्चा करून, पुढील पाच वर्षाचा विकास आराखडा तयार काण्यात आला. यामध्ये गावनिहाय पिण्याचे पाणी, गाव स्वच्छता, शिक्षण, अंगणवाडी यांना प्रथम प्राधान्य देऊन, गावातील इतर ही कामांचा विकास आराखडा तयार करण्यात आला.
यावेळी पंचवार्षिक आराखडा तयार करतांना येरमनार ग्रा.पं.चे उपसरपंच श्री पोच्या तलांडी, श्री विजय आत्राम सदस्य, गाव पाटील श्री डोलू मडावी, येरमनार चे ग्रामसेवक श्री एन.झेड.नरोटे, श्री आर.एम.पटाण सर (मुख्याध्यापक येरमनार), श्री डी.टी.कुमरे (प्रा.शिक्षक), मांंडरा ग्रा.पं.ग्रामसेवक श्री एच.डी.पुराम, सौ मीना कोंडगुर्ले (अंगणवाडी सेविका), सौ अर्चना आत्राम (अंगणवाडी सेविका ), सौ रेश्मा कोंडगुर्ले (अंगणवाडी सेविका), सौ प्रियांका आत्राम (आशा वर्कस), सौ गौरी गोवार्धन (आशा वर्कस) आणि येरमनार ग्रा.पं.मधील सर्व कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा