मुल येथील उलगुलान संघटनेच्या रक्तदान शिबिराला युवकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग

चंद्रपूर/मुल : - दि- २८/१०/२०२० - कोरोनाच्या महासंकट काळात रक्ताचा पुरवठा कमी पडू नये याकरिता उलगुलान संघटना शाखा-मुल द्वारा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला मुल शहरातील तथा तालुक्यातील ५० च्या वर युवकांनी रक्तदान केले. रक्तदान हेच महादान हा संकल्प ठेवून उलगुलान संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भव्य रक्तदान शिबिरात मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदानाचे कार्य केले. उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजूभाऊ झोडे यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात अत्यंत उत्तम पद्धतीने रक्तदानाचे कार्य पार पाडले. उलगुलान संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अतिशय परिश्रम करुन रक्तदान शिबिराचे आयोजन केले याबद्दल उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजूभाऊ झोडे यांनी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे तसेच रक्तदात्यांचे आभार मानले.
सदर रक्तदान शिबिराचे आयोजन अत्यंत उत्तम पद्धतीने पार पाडणारे उलगुलान संघटना शाखा मुल चे अध्यक्ष निखिल वाढई, उपाध्यक्ष प्रणित पाल, आकाश येसनकर, सुजित खोब्रागडे, रोहित शेंडे, अक्षय दुमावार, वतन चिकाटे, आरिफ खान पठाण, अजय दहिवले, साहिल खोब्रागडे, निहाल गेडाम, हर्षल भुरसे, मिटुसिंग पटवा तथा असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.