पोलीस स्टेशन, भामरागड येथे वीर शहीद जवानांना स्मृतीदीनी श्रध्दांजली वाहण्यात आली
गडचिरोली/भामरागड : - २१ आक्टोबर हा दिवस महाराष्ट्र पोलीस दलाचा स्मृतीदीन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात जनतेच्या सेवेसाठी नक्षलवाद्यांसोबत दोन हात करून लोकशाहीचा बचाव करण्यासाठी स्वताच्या निधडया छातीवर गोडी झेलुन विरमरण आलेल्या विरशहीद जवानांना पोलीस स्टेशन भामरागड येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
सदर कार्यक्रमाला श्री डॉ. कुणाल सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड, श्री संदीप भांड पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन-भामरागड, पोउनि कर्नेवाड, झोल, कराडे, उघडे, श्री चव्हाण पोलीस निरीक्षक, सिआरपीएफ भामरागड, तसेच सिआरपीएफ अधिकारी, एसआरपीएफचे पोउनि मडावी, भामरागड पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.
श्री डॉ.कुणाल सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड यांनी वीर शहीद जवानांनी दिलेल्या बलिदानावर प्रकाश टाकून त्यांनी केलेल्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री ज्ञानेश्वर झोल पोउनि यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा