भामरागड तालुक्यातील भुसेवाडा येथील नाल्यावर लोकसहभागातून बांबु पुल तयार करण्यात आले
गडचिरोली/भामरागड : - ग्रामपंचायत मल्लमपोडुर अंतर्गत असलेला भुसेवाडा गावाच्या दोन किलो मीटर अलीकडे बारमाही वाहणारा नाला आहे. या नाल्याला बाराही महीने पानी असल्याने व नाल्यावर पुल नसल्याने गावातील नागरिकांना व कर्मचाऱ्यांना कमरभर पाण्यातून वाट काढत जावे लागते. त्यात रात्रीला कोणी आजारी पडल्यास आशा वर्कर यांना उपकेंद्र येथे माहिती देण्यास जाण्याकरिता पाण्यातून वाट काढायला खुप त्रास सहन करावा लागायचं. तसेच शिक्षक ,ग्रामसेवक ,अंगणवाडी सेविका यांना सुद्धा ओले होऊनच गावात जावे लागायाचे. यावर काहीतरी मार्ग काढावा यांकरीता ग्रामपंचायतिचे सचिव श्री अविनाश गोरे यांनी 15 ऑक्टोंबर रोजी गावात सभा घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. या सभेत महिलांनी देखील सहभाग घेऊन काहीही करून रस्ता तयार करावा अशी मागणी केली. यावर ग्रामसेवक श्री गोरे यांनी गावात बांबू मुबलक प्रमाणात असल्याने कर्मचारी वर्ग व गावकरी यांचे लोकसहभागातून बांबूचा पुल तयार करण्याची संकल्पना मांडली. गावकरी व सभेस उपस्थित कर्मचारी यांनी सुध्दा सहमति दर्शवली व सर्वानुमते 20 ऑक्टोबर ला बांबू पुल तयार करण्याचे ठरविले. याकरीता लागणारे सर्व साहित्य जमा करून दि.20 ऑक्टोंबर।ला ग्रामपंचायतिचे सरपंच अरुणाताई वेलादि , ग्रामसेवक अविनाश गोरे, अंगणवाडी सेविका शेवंता कुमरे, आशा वर्कर गव्हारे ग्रामपंचायत कर्मचारि साईनाथ गव्हारे ,अरुण काळंगा ,गावकरी रामा ओक्सा ,मनोहर ओक्सा ,जगदीश पल्लेा,मंगरू वड्डे व समस्त गावकरी यांचे उपस्थितीत मोटार सायकल जाऊ शकेल अशा प्रकारच्या बांबू पुलिया चे बांधकाम करण्यात आले. याप्रसंगि दिवसभर ग्रामसेवक ,सरपंच व कर्मचारी हे उपस्थित राहुन काम केल्याबद्दल गावकरी यांनी समाधान व्यक्त केले. या कामाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक करण्यात येत असुन यामुळे काही काळाकरीता का होईना पण जाण्या-येण्या करीता मार्ग तयार झाला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा