कोल्हापूर जिल्ह्याचे ३४वे पोलीस अधीक्षक म्हणून शैलेश बलकवडे यांनी पदभार स्वीकारला.

प्रभाकर डोंगरे : -मुख्यसंपादक

कोल्हापूर : - पोलिस दलाच्या कामाची अत्यंत साधी, सोपी पद्धत आहे. उपेक्षित, अन्यायग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका राहिली पाहिजे. सामान्यांना विश्‍वास देत, गुंडांना ठेचून काढण्याची कोल्हापूर पोलिस दलाची भूमिका राहील, असे नूतन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी बुधवारी स्पष्ट केले.
मटका, जुगारी अड्ड्यांसह तस्करी उलाढाली चालू देणार नाही. काळेधंदे बंदच राहतील, असेही त्यांनी प्रभारी अधिकार्‍यांना बजावले.
जिल्ह्याचे ३४ वे पोलिस अधीक्षक ठरलेले बलकवडे यांनी प्रभारी पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडून बुधवारी सकाळी पदभार स्वीकारला. यावेळी गडहिंग्लज विभागाचे अपर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांच्यासह अधिकारी, कर्मचार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. बलकवडे मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील.औरंगाबाद, नागपूर ग्रामीणला अपर अधीक्षक, अहमदनगरला अपर पोलिस अधीक्षक, नागपूर रेल्वेला पोलिस अधीक्षक, गडचिरोली जिल्ह्यात दोन वर्षे पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत होते. तेथून त्यांची कोल्हापूरला नियुक्‍ती झाली आहे.
पदभार स्वीकारताच बलकवडे यांनी माध्यमाशी संवाद साधला. ते म्हणाले, तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सामान्य लोकांमध्ये पोलिस दलाची विश्‍वासार्हता निर्माण केली आहे. त्याच पद्धतीने कामाची पद्धत राहील. सामान्य लोकांना त्यांना न्याय देण्याची प्रामाणिक भूमिका राहिल.
बोलण्यापेक्षा कर्तव्य बजाविण्यावर आपला भर राहील. कोल्हापूर जिल्ह्यात कर्तव्याची संधी मिळणे हा मोठा योग आहे. सामान्य लोकांना पोलिस ठाण्यातच न्याय मिळाला पाहिजे. लाचखोरी, आर्थिक पिळवणुकीला थारा देणार नाही. जाणीवपूर्वक केलेल्या कृत्याला क्षमा करणार नाही. राजारामपुरी पोलिस ठाण्यात घडलेल्या लाचखोरीतील संशयितांवर निश्‍चित कठोर कारवाई झालेली दिसून येईल असे हि बलकवडे यांनी स्पष्ट केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.