आश्रमशाळा विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या वाढविण्यासाठी कार्यशाळा
आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके राहणार उपस्थित
गडचिरोली, (जिमाका) दि. २४ : आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या वतीने शासकीय आश्रम शाळांतील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनेबाबत नागपूर विभागीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन स्थानिक धानोरा मार्गावरील महाराजा सेलिब्रेशन हॉलमध्ये शनिवार २५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता केलेले आहे. या कार्यशाळेला राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कार्यशाळेत राज्याचे आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त लीना बनसोड ,सह सचिव म.रं. शेळके ,उप सचिव र.तु.जाधव, कक्ष अधिकारी स.वि.कोवे ,नागपूर विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह ,नाशिक विभागाचे उप आयुक्त संतोष ठुबे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अरुण एम.आदींसह नागपूर विभागातील सर्व प्रकल्प अधिकारी ,सहाय्यक प्रकल्प अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
नागपूर विभागातील गडचिरोली, अहेरी, भामरागड, चंद्रपूर, चिमूर, देवरी, भंडारा, वर्धा व नागपूर या नऊ प्रकल्पातील एकूण ७६ शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापक, अधीक्षक व वसतीगृहाचे गृहपाल यांचा सदर कार्यशाळेत सहभाग राहणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा