सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल तीन दिवसीय गडचिरोली दौऱ्यावर

गडचिरोली, (जिमाका) दि.२९: राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल दिनांक २९ एप्रिल ते १ मे २०२६ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात विविध विकासकामांचा आढावा तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार दि. २९ एप्रिल सायंकाळी ७.३० वाजता देसाईगंज (वडसा) येथे आगमन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पदस्पर्शभूमी (दीक्षाभूमी) येथे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. रात्री ९.३० वाजता गडचिरोली येथे आगमन व शासकीय विश्रामगृहात मुक्काम.

गुरुवार (दि. ३० एप्रिल) रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे विविध विषयांवरील आढावा बैठकीस ते उपस्थित राहतील. सायं. ६.३० वाजता विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.

शुक्रवार (दि. १ मे) रोजी सकाळी ८ वाजता महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त पोलीस क्रीडांगण, गडचिरोली येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती. त्यानंतर ९ ते ११ दरम्यान मेढा, आमिर्झा व इंजेवारी (ता. आरमोरी) येथे अनुक्रमे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना व अंगणवाडी केंद्रांच्या उद्घाटन कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. ११.४५ वाजता आरमोरी विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सोयीनुसार रामटेक कडे प्रयाण.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोलीस–नक्षल चकमकीत तीन महिलांसह चार नक्षलवादी ठार – कोपर्शी जंगलातील मोठी कारवाई.

गडचिरोलीत हेलिकॉप्टर ‘देवदूत’चा गौरव, पण लोह खनिज वाहतुकीमुळे बळी गेलेले नागरिक, रस्ते व दुर्घटनांचे काय?

एटापल्ली ते वांगेतूरी बस फेरी मेढरी गावापर्यंत सोडण्यात यावे.भारतीय कम्युनिष्ट पक्ष (CPI) यांची मागणी.