अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता इयत्ता १ ली मध्ये शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

गडचिरोली, (जिमाका) दि.२०: “अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे” या योजनेअंतर्गत शैक्षणिक सत्र २०२६-२७ करीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता १ ली मध्ये प्रवेश देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय, गडचिरोली मार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

इयत्ता १ ली मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी अनुसुचित जमातीचा असावा व दिनांक ०१ जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत जन्मलेला असावा. विद्यार्थ्याचा पालक शासकीय/निमशासकीय नोकर नसावा व त्यांचे वार्षिक उत्पन्न रूपये दोन लक्ष पेक्षा कमी असावे. या योजनेअंतर्गत आदीम जमाती/ दारीद्रय रेषेखालील / विधवा / घटस्फोटित व निराधार यादीतील पाल्याचा प्राधान्याने विचार केला जाईल. इयत्ता १ ली प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.

 इयत्ता १ ली प्रवेशासाठीचे अर्ज प्रकल्प कार्यालय, गडचिरोली तसेच प्रकल्पांतर्गत नजीकच्या शासकीय/ अनुदानित आश्रमशाळेत उपलब्ध होतील अथवा स्विकारले जातील. प्रवेशासाठीचे आवेदन पत्र आवश्यक कागदपत्रांसह दि.  एप्रिल २०२६ पर्यंत कार्यालयास सादर करण्यात यावे. असे सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोलीस–नक्षल चकमकीत तीन महिलांसह चार नक्षलवादी ठार – कोपर्शी जंगलातील मोठी कारवाई.

गडचिरोलीत हेलिकॉप्टर ‘देवदूत’चा गौरव, पण लोह खनिज वाहतुकीमुळे बळी गेलेले नागरिक, रस्ते व दुर्घटनांचे काय?

एटापल्ली ते वांगेतूरी बस फेरी मेढरी गावापर्यंत सोडण्यात यावे.भारतीय कम्युनिष्ट पक्ष (CPI) यांची मागणी.