मिशन लक्षवेध अंतर्गत टेबल टेनिस खेळाडूंची पुनश्च निवड चाचणी

गडचिरोली, (जिमाका) दि.२२: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे मार्फत “मिशन लक्षवेध योजना” ही धोरणात्मक योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत टेबल टेनिस या खेळाचे विभागीय क्रीडा निपुणता केंद्र उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, नागपूर विभाग, नागपूर येथे स्थापन करण्यात येणार असुन टेबल टेनिस या खेळाची निवड चाचणी याआधी माहे मार्च २०२६ आयोजीत करण्यात आली होती. परंतु संचालनालयाकडून प्राप्त निकषानुसार सर्व खेळाडू पात्र न ठरल्यामुळे पुनश्च टेबल टैनिस या खेळाची निवड चाचणी दि. २७/०४/२०२६ रोजी सकाळी ०९.०० वाजता इनडोअर हॉल विभागीय क्रीडा संकुल, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर येथे घेण्यात येणार आहे.

 “मिशन लक्षवेध योजना” अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, नागपूर विभाग, नागपूर येथे विभागीय क्रीडा निपुणता केंद्र अंतर्गत स्थापित होणाऱ्या प्रशिक्षण केंद्राकरिता खेळाडू निवड निकष पुढीलप्रमाणे आहेत.

टेबल टेनिस :

१. वयोमर्यादा :-  २५ वर्षाआतील मुले/मुली (त्या वर्षाच्या ३१ डिसेंबर रोजी)

२. आवश्यक कागदपत्रे :- जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, गत २ वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटोग्राफ, शाळा / महाविद्यालय बोनाफाईट प्रमाणपत्र, पालकाचे संमती पत्र इ.

३. अधिवास :- महाराष्ट्र राज्यातील खेळाडू असला पाहिजे.

४. क्रीडा कामगिरी :- राज्यातील खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावरील सहभागी खेळाडू (SGFI, AFI, KHELO INDIA NATIONAL ONLY) गत 2 वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यमापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य व तंदुरुस्ती (FITNESS) चाचण्यांमध्ये पात्र होणे आवश्यक

५. वैद्यकीय चाचणी :- शासन मान्यताप्राप्त डॉक्टराकडून दिलेले वैद्य वैयक्तीक फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य.

६. अधिक माहिती करीता संपर्क :- श्री. श्रीराज बलोदे, क्रीडा अधिकारी मो.नं. 9860202285.

उपरोक्त आयोजीत होणाऱ्या निवड चाचणीकरीता गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी / खेळाडूंनी सहभागी होऊन विभागीय क्रीडा निपुनता केंद्रात आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन भास्कर घटाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.