प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड सन २०२६-२७ या वर्षाकरिता अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेशाबाबत सूचना
गडचिरोली, (जिमाका) दि.२०:एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली या प्रकल्प कार्यालयांतर्गत सन २०२६-२७ या वर्षाकरिता अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली करिता अनुसुचित जमातीचे नविन प्रवेशित करण्याच्या अनुषंगाने योजनेतील मान्यताप्राप्त शाळामध्ये इतर कोणत्याही विभागांच्या योजनामधून प्रवेशित झालेले विद्यार्थी वगळून सदर शाळेत निवासी असलेल्या उर्वरीत विद्यार्थी संख्येच्या २५ टक्के मर्यादेत अनुसुचित जमातीचे विद्यार्थी प्रवेशित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे अर्जासोबत विद्यार्थ्यांचे नजीकच्या काळातील दोन पासफोर्ट साईज फोटो,पालकाचे उत्पनाचे प्रमाणपत्र १ लक्षापेक्षा जास्त नसावे(तहसिलदार), पालकाचे/विद्यार्थ्यांचे रहिवासी प्रमाणपत्र, पालकाचे/विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र, (तहसिलदार/उपविभागीय अधिकारी), जन्म प्रमाणपत्र (अंगणवाडी/ ग्रामसेवक), दारिद्रय रेषेखाली असल्यास ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, महिला पालक विधवा/घटस्फोटित/निराधार/परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत(आधार कार्ड पडताळणी केलेला), इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
इयत्ता पहिलीत प्रवेश घेऊ इच्छिणा-या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले असून सदर प्रवेश अर्ज भामरागड व एटापल्ली तालुक्यातील शासकिय आश्रम शाळा, अनुदानित आश्रम शाळा, प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड, व सुविधा केंद्र, शासकिय आदिवासी मुलांचे वसतिगृह,एटापल्ली येथे उपलब्ध राहील व परिपूर्ण भरलेला प्रवेश अर्जासोबत कागदपत्रे जोडून उपरोक्त ठिकाणी जमा करण्यात यावे. असे आवाहन अमर राऊत, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा