राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा २३ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्हा दौरा

विश्रामगृह भेट, जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक; विविध कार्यक्रमांना उपस्थिती

गडचिरोली, (जिमाका) दि. २२ : राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार तसेच गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री मा. ना. ॲड. आशिष जयस्वाल यांचा गुरुवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा निश्चित करण्यात आला आहे. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून आढावा बैठक घेणार आहेत.

दौरा कार्यक्रमानुसार, सकाळी ०९.३० वाजता रामटेक येथून गडचिरोलीकडे प्रयाण करून नागपूर–भिवापूर–आसरी मार्गे ते दुपारी १२.३० वाजता गडचिरोली येथील विश्रामगृहात आगमन करतील. त्यानंतर दुपारी ०१.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आयोजित बैठकीस ते उपस्थित राहून जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेणार आहेत.

सायंकाळी ०५.३० वाजता पुन्हा विश्रामगृहात आगमन व राखीव वेळ ठेवण्यात आला असून, रात्री ०८.०० वाजता गडचिरोली येथून रामटेककडे परतीचा प्रवास करणार आहेत.
या दौऱ्यादरम्यान मा. राज्य मंत्र्यांना आवश्यक ती सुरक्षा व समन्वय व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. तसेच दौऱ्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींना कळविण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकीत विविध विभागांच्या प्रलंबित कामांचा आढावा घेऊन विकासकामांना गती देण्यावर भर दिला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

नागेपल्ली येथील श्मशानभूमीवर अंतिम संस्कारसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर (वराहपालक) अतिक्रमणकारांचे जीवघेणे हल्ले.