एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड येथीलशासकीय आश्रमशाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रकीया सुरु
गडचिरोली, (जिमाका) दि.२०:एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड जि.गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, निवास आणि सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी या शाळांमध्ये नवीन प्रवेश देण्यात येत आहेत.
प्रवेशासाठी उपलब्ध शाळा:
खालील शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे:
१. जारावंडी (इंग्रजी माध्यम) २. ताडगाव (इंग्रजी माध्यम) ३. तोडसा (मुलींसाठी) ४. कसनसूर ५. हालेवारा, ६. जांबिया, ७. लाहेरी, ८. कोठी
शाळेतील उपलब्ध प्रमुख सोयी-सुविधा:
शासकीय आश्रमशाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनामार्फत खालील सुविधा पूर्णतः मोफत दिल्या जातात.
दर्जेदार शिक्षण:- मराठी, सेमी-इंग्रजी व इंग्रजी माध्यमाची सोय आणि अनुभवी शिक्षक.
मोफत निवास व भोजन: सुसज्ज वसतिगृह आणि सकस आहार (नाश्ता, दोन वेळचे जेवण).
शैक्षणिक साहित्य: गणवेश, पाठ्यपुस्तके, वह्या, दप्तर व इतर स्टेशनरी.
वैद्यकीय सुविधा: विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी नियमित तपासणी आणि प्रथमोपचार सुविधा.
क्रीडा व सांस्कृतिक विकास: क्रीडांगण, क्रिडा साहित्य आणि कला गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम.
स्मार्ट व व्हर्च्युअल क्लासरूम: आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ऑडिओ-व्हिज्युअल पद्धतीने शिक्षण.
कॉम्प्युटर व टॅब लॅब:- विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र संगणक कक्ष आणि अभ्यासासाठी टॅबलेटची सुविधा.
प्रयोगशाळा व ग्रंथालय :- सर्व सुविधायुक्त प्रयोगशाळा व ग्रंथालय
विविध शैक्षणिक उपक्रम:- 1.माझी शाळा, माझा स्वाभिमान, 2.प्रकल्प अभिव्यक्ती, 3.बाल मैत्री पुर्ण आश्रमशाळा
JEE/NEET तयारी: उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी (JEE) आणि वैद्यकीय (NEET) प्रवेश परीक्षांचे विशेष मार्गदर्शन व चाळणी परिक्षा
विविध स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन :- नवोदय परिक्षा, शिष्यवृती परिक्षा, इ.
CCTV देखरेख: विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण शाळा आणि वसतिगृह परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली.
DBT सुविधा: दैनंदिन वस्तू करीता थेट लाभ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात (DBT) जमा करण्याची व्यवस्था.
आवश्यक कागदपत्रे:- विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला/ टी.सी.(मूळ प्रत), जातीचा दाखला, आधार कार्ड, बँक पासबुक, मागील वर्षाचे निकाल, पासपोर्ट फोटो
संपर्क :-
इच्छुक पालकांनी प्रवेशासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक किंवा शिक्षण शाखा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, भामरागड येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन अमर राऊत, प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी, भामरागड जि. गडचिरोली यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा