परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

गडचिरोली, (जिमाका) दि.२८: राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) नवी दिल्ली यांच्यामार्फत NEET (UG) -२०२६ ही परिक्षा दिनांक ०३ मे २०२६ रोजी दुपारी २.०० ते ५.०० वाजेपर्यत जिल्हा मुख्यालयातील विविध परिक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. या परिक्षा केंद्रावरील परिक्षा शांततेच्या वातावरणात पार पडतील व तेथील परिक्षार्थींना तणावमुक्त वातावरणात परिक्षा देणे शक्य होईल अशी व्यवस्था करावी म्हणून सदर परिक्षा केंद्रांच्या परिसरात २०० मीटर अंतरापर्यंत भारतीय नागरी सुरक्षा संहितेचे कलम १६३ अन्वये मनाई हुकुम जारी करणे हे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता आवश्यक झाले आहे.

त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी, अविश्यांत पंडा यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये सदर परिक्षा सुरळीतपणे व पारदर्शकपणे पार पाडण्याच्या दृष्टीने सदर परिक्षा केंद्राच्या २०० मिटर अंतरापर्यंत पुढीलप्रमाणे बाबी/कृत्ये करण्यास मनाई आदेश जारी केले आहे.

निषिद्ध क्षेत्रात झेरॉक्स मशीन, फॅक्स व एस टी डी बुथ परिक्षा कालावधीत सुरु राहणार नाही. परिक्षा केंद्रात व परिसरात मोबाईल फोन, लॅपटॉप, पेजर, टेपरेकॉर्डर, कॅमेरा इत्यादींचा वापर करता येणार नाही. निषिद्ध क्षेत्रात नारेबाजी करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, भाषण करणे, घोषणा करता येणार नाही. पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर ठेवता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेता येणार नाही. परिक्षा केंद्रापासून २०० मीटर अंतरावर चुन्याची लाईन आखण्यात यावी. कोणत्याही व्यक्तीकडून परिक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परिक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस/ वाहनास प्रवेशास मनाई राहील.

सदर आदेश कर्तव्य बजावणारे वरिष्ठ अधिकारी, आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलेले वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना लागू राहणार नाही. पोलीस अधिक्षक, गडचिरोली यांनी परिक्षेच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करून आवश्यक पोलीस बंदोबस्त लावण्याची कार्यवाही व जबाबदारी पार पाडावी. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध फौजदारी नियमांतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. सदर अधिसूचना परिक्षेच्या दिनांक ०३ मे २०२६ रोजी दुपारी २.०० ते ५.०० वाजेपर्यत अमलात राहील असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोलीस–नक्षल चकमकीत तीन महिलांसह चार नक्षलवादी ठार – कोपर्शी जंगलातील मोठी कारवाई.

गडचिरोलीत हेलिकॉप्टर ‘देवदूत’चा गौरव, पण लोह खनिज वाहतुकीमुळे बळी गेलेले नागरिक, रस्ते व दुर्घटनांचे काय?

एटापल्ली ते वांगेतूरी बस फेरी मेढरी गावापर्यंत सोडण्यात यावे.भारतीय कम्युनिष्ट पक्ष (CPI) यांची मागणी.