०४ मे रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

गडचिरोली, (जिमाका) दि. २३ : सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, शासन परिपत्रकामधील सुचनानुसार लोकशाही दिन दिनांक ४ मे २०२६ रोजी (सोमवार) दुपारी ३.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहात आयोजित करण्यात येत आहे.

ज्या तक्रारदारांना जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा असल्यास, त्यांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारीचे निराकरण होवून प्राप्त झालेल्या अहवालावर समाधान न झाल्यास तहसिलदारांच्या उत्तराची प्रत व तालुका लोकशाही दिन टोकन क्रमांक प्रत जोडून विहित नमुन्यातील (प्रपत्र १ (ब)) अर्ज व त्यासोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी पाठविणे आवश्यक राहिल. तसेच तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही. असे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोलीस–नक्षल चकमकीत तीन महिलांसह चार नक्षलवादी ठार – कोपर्शी जंगलातील मोठी कारवाई.

गडचिरोलीत हेलिकॉप्टर ‘देवदूत’चा गौरव, पण लोह खनिज वाहतुकीमुळे बळी गेलेले नागरिक, रस्ते व दुर्घटनांचे काय?

एटापल्ली ते वांगेतूरी बस फेरी मेढरी गावापर्यंत सोडण्यात यावे.भारतीय कम्युनिष्ट पक्ष (CPI) यांची मागणी.